OTT Release this Week : अॅक्शन चित्रपटांपासून ते रोमँटिक कथा आणि कौटुंबिक शोपर्यंत या आठवड्यात अनेक चांगले चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. त्यांचा तुम्ही तुमच्या कुटुंबासह घरी बसून आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात (१८ ते २५ ऑगस्ट) कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत?
इत्ती सी खुशी
ही कथा अन्विता नावाच्या एका मुलीची आहे, जी मुंबईत राहते आणि तिच्या सहा भावंडांमध्ये ती सर्वांत मोठी असते. तिचे वडील मद्यपी असतात आणि तिची आई घर सोडून गेलेली असते. त्यामुळे तिला तिचे शिक्षण सोडून, कुटुंबाची काळजी घ्यावी लागत आहे आणि यादरम्यान ती ‘इत्ती सी खुशी’च्या शोधात आहे. ही वेब सीरिज १८ ऑगस्ट रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
अमार बॉस
ही कथा एका पुस्तक प्रकाशकाची आहे, ज्याच्यावर त्याच्या ऑफिसमध्ये खूप दबाव असतो. कारण- त्याची आई तिथे इंटर्न म्हणून रुजू झालेली असते. ही कथा २२ ऑगस्टपासून Zee5 वर पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
माँ
ही कथा एका महिलेची आहे, जिच्या पतीचा मृत्यू भयानक झालेला असतो आणि आता तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या मुलीला वाचवण्यात दाखवले आहे. ती तिच्या गावी परतते; पण इथे तिला एका शापाचा सामना करावा लागतो. काजोल स्टारर हा चित्रपट २२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
मारीसन
जर तुम्हाला काही मनोरंजक पाहायचे असेल, तर ‘मारीसन’ २२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. ही कथा एका चोराची आहे, जो पिल्लई नावाच्या एका वृद्ध माणसाशी मैत्री करतो. कारण- पिल्लईला गोष्टी विसरण्याची सवय असते आणि चोर त्याची मालमत्ता ताब्यात घेऊ इच्छितो. परंतु, रोड ट्रिपदरम्यान अनेक मनोरंजक गोष्टी घडतात.
थलाईवन थलाईवी
जर तुम्हाला कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा असेल आणि काही हलक्याफुलक्या व मजेदार गोष्टी पाहायच्या असतील, तर ‘थलाईवन थलाईवी’ २२ ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल, ज्याची कथा खूपच मनोरंजक आहे.
बिग बॉस १९
रिअॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १९’ हा २४ ऑगस्टपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर सुरू होणार आहे. सलमान खानने होस्ट केलेल्या या रिअॅलिटी टीव्ही शोबद्दल बरीच चर्चा आहे.