२०२२ या वर्षाची सुरुवात ‘द काश्मीर फाइल्स’ या सुपरहीट चित्रपटाने झाली तर या वर्षाचा शेवट ‘दृश्यम २’ या चित्रपटाच्या घवघवीत यशाने झाली. ‘दृश्यम’च्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षक उत्सुक होते, शिवाय मल्याळमध्ये याचा पुढचा भाग आल्यावर तर ती उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली. यामुळेच या चित्रपटाच्या रिमेकलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आणि याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता अजय देवगणचा हा ‘दृश्यम २’ ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. ‘दृश्यम २’ हा आता प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. शुक्रवारपासूनच हा चित्रपट या ओटीटी माध्यमावर पाहायला मिळणार आहे. याबद्दल अभिनेता अजय देवगण हा चांगलाच उत्सुक आहे.

आणखी वाचा : Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील-सुबोधचा ‘वाळवी’ पाहायलाच हवा, कारण…

याविषयी अजय देवगण म्हणाला, “प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहिन. आता ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट आणखी जास्त लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इतर भाषांमध्ये या चित्रपटाने जी कामगिरी केली आहे तसंच हा चित्रपटही लोकांना प्रचंड आवडेल आणि त्यांचं भरपूर मनोरंजन करेल.”

‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तब्बल ३ आठवडे बॉक्स ऑफिसव ठाण मांडले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २३९ कोटीहून अधिक कमाई केली. यात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता बॉक्स ऑफिसप्रमाणेच ओटीटीवर हा चित्रपट धुमाकूळ घालणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn starrer superhit movie drishyam 2 will be available on ott platform avn