Do not Watch 7 Bollywood Movies with Family : बॉलीवूडमध्ये कॉमेडी, थ्रिलर, रोमँटिक, अॅक्शन अशा विविध जॉनरचे अनेक चित्रपट दरवर्षी तयार होतात. पण काही चित्रपट इतके बोल्ड असतात की तुम्ही ते कुटुंबाबरोबर बसून पाहू शकत नाही. अशाच सात चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चित्रपटात बोल्ड सीन्सचा भडिमार आहे. हे सर्व चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत. यापैकी एका चित्रपटात दिग्गज अभिनेत्री रेखा आहेत. त्यांचा हा सिनेमा ओटीटीवर असूनही तुम्ही भारतात पाहू शकत नाही.
द डर्टी पिक्चर
विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित आहे. यात इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह व तुषार कपूर आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन लूथरियाने केलं होतं. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
मर्डर
अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली होती. यात इमरान हाशमी, अश्मित पटेल व मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध आहे.
जिस्म
२००३ मधील या इरॉटिक थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन अमित सक्सेना यांनी केलं होतं. या चित्रपटाचं लेखन महेश भट्ट यांनी केलं होतं. जॉन अब्राहम व बिपाशा बासूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
बीए पास
२०१२ साली आलेला बीए पास हादेखील इरॉटिक थ्रिलर सिनेमा आहे. याचं दिग्दर्शन अजय बहलने केलं आहे. यात शिल्पा शुक्ला, शादाब कमाल, राजेश शर्मा व दिव्येंदु भट्टाचार्य हे कलाकार आहेत. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.
फायर
१९९६ सालचा ‘फायर’ चित्रपट एक इंडो-कॅनेडियन इरॉटिक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. दीपा मेहता दिग्दर्शित या चित्रपटात शबाना आझमी व नंदिता दास यांच्या मुख्य भूमिका आहेत. समलैंगिक संबंधांवर आधारित हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रचंड विरोध झाला होता. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
कामसूत्र- ए टेल ऑफ लव्ह
हा १९९६ मधील एक इरॉटिक चित्रपट आहे. मीरा नायरने याचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं नाव प्राचीन ग्रंथ कामसूत्रवरून घेण्यात आलंय. यात रेखा नवीन अँड्रयूज, सरिता चौधरी, रेमन टीकाराम व इंदिरा वर्मा यांनी काम केलंय. या चित्रपटावर भारतात बंदी आहे, त्यामुळे तो प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असूनही तुम्हाला पाहता येणार नाही. यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिलंय.
हंटर
२०१५ मधील हा एक अडल्ट कॉमेडी चित्रपट आहे. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात गुलशन देवैया, राधिका आपटे व सई ताम्हणकर आहेत. सेक्स अॅडिक्ट व्यक्तीवर आधारित हा चित्रपट आहे. तुम्ही तो प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.