सध्या सगळेच प्रेक्षक ओटीटीकडे वळले आहेत. खासकरून ओटीटीच्या बाबतीत भारतीय प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड महामारीमुळे ही वाढ झाली आहे. पण त्याआधी प्रेक्षकांना ‘वेबसीरिज’ची ओळख करून देणारा एकमेव शो तो म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’. या वेबसिरिजची भारतात खासकरून जास्त चर्चा झाली. भारतीया प्रेक्षकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी या सीरिजची पारायाणं केली आहेत. यामधली पात्रं तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच या सिरिजचा प्रीक्वल मांडणारी गोष्ट ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या दोन्ही सीरिजना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता पुन्हा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे, याला निमित्त ठरलं आहे ते म्हणजे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस.

आणखी वाचा : सनी देओलने केली मानधनात कपात; ‘गदर २’चे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, “कित्येक अभिनेते…”

सध्या सोशल मीडियावर AI च्या माध्यमातून तयार केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’ जर बॉलिवूडमध्ये बनली असती तर त्यात कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत अगदी चपखल बसले असते याची एक झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओची आणि AI ने तयार केलेल्या त्या बॉलिवूड कलाकारांच्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे.

या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह हा जॉन स्नोच्या अवतारात पाहायला मिळत आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन ही डेनेरीस टार्गेरियनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. जेमी लॅनिस्टर म्हणून आदित्य रॉय कपूर तर आलिया भट्ट ही आर्या स्टार्कच्या अवतारात पाहायला मिळत आहे. तब्बू ही सेर्सी लॅनिस्टर म्हणून अगदी चपखल बसली आहे आणि याचं कौतुक नेटकऱ्यांनीही केलं आहे. के के मेनन हा टिरियन लॅनिस्टर म्हणून तर कियारा अडवाणी ही सान्सा स्टार्क म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे.

अर्थात हा AI च्या माध्यमातून तयार केलेला व्हिडिओ असल्याने यात काहीच तथ्य नाहीये, पण एकूणच या पात्रांसाठी AI ने केलेली बॉलिवूड कलाकारांची निवड पाहून सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Game of thrones ai version with bollywood actors like ranveer singh aishwarya rai avn