‘मोनिका ओ माय डार्लिंग’ गाण्याने ऐंशी दशकात धुमाकूळ घातला होता. या गाण्याची क्रेझ आजही आहे. हे गाणे नजीकच्या काळात बॉलिवूड चित्रपटांमध्ये वापरले आहे. ‘मोनिका ओ माय डार्लिंग या शब्दांवर आता चित्रपट येत आहे. नेटफ्लिस नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चित्रपट विनोदी तसेच मर्डर मिस्ट्रीवर आधारित असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असं दिसत आहे की राजकुमार राव हुमा कुरेशीच्या जाळ्यात अडकलेला दिसत आहे. तिच्यापासून दूर जाण्याचे मार्ग शोधत असताना त्याला ब्लॅकमेल केले जात आहे. यातच सिकंदर खेर येतो आणि राजकुमारला अंतिम उपाय सांगतो. एक मृतदेह राजकुमार गाडीतून नेतो एकामागोमाग एक घटना घडतात. राधिका आपटेला पोलीस अधिकारी म्हणूनही दाखवण्यात आले आहे. डार्क कॉमेडी शैली ट्रेलरमधून दिसून येते. २. २५ मिनिटांचा हा ट्रेलर आहे.

“मी बटाट्यासारखा…”; ‘फोन भूत’ चित्रपटातील भूमिकेविषयी जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

या चित्रपटात राजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे, सिकंदर खेर, आकांशा रंजन कपूर, बागवती पेरुमल, झेन मेरी खान आणि सुकांत गोयल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. प्रदर्शनाच्याअगोदर, निर्मात्यांनी अखेर ट्रेलरचे अनावरण केले आहे आणि त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. राजकुमार, हुमा आणि राधिका आपटे त्यांच्या नवीन अवतारांमध्ये दिसत आहेत.

हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ नेटाफिल्क्सवर प्रदर्शित होणार आहे. मॅचबॉक्स शॉट्स या बॅनरखाली सरिता पाटील, संजय राउत्रे आणि दिक्षा ज्योते राउत्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monica o my darling trailer out rajkummar rao huma qureshi radhika apte in avatar spg