‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री एका हुक्का पार्लरवर छापा टाकून काही जणांना ताब्यात घेतलं. त्यामध्ये स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. हुक्का पार्लरमध्ये अवैध सेवन होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, त्यानंतर त्यांनी छापेमारी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं, त्यात मुनव्वर फारुकीच्या नावाचाही समावेश आहे. “आमच्या टीमला एका मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही छापेमारी केली. तिथं सापडलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर काही लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे,” अशी माहिती या छाप्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

छापेमारीनंतर गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ट परिसरातील हुक्का पार्लरवर छापा टाकल्यावर ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकी व इतर १३ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हुक्का पार्लर बेकायदेशीरपणे चालवले जात होते. छापेमारीत ४,४०० रुपये रोख आणि १३,५०० रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आलं आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं कायद्याच्या कलमांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनव्वरने शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

ताब्यात घेतल्याची बातमी आल्यानंतर मुनव्वर फारुकीने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे. थकलोय तरी प्रवास करतोय, असं त्याने स्टोरीमध्ये मुंबई विमानतळावरून फोटो शेअर करत लिहिलं आहे.

मुनव्वर फारुकीची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, मुनव्वर फारुकीने या हुक्का पार्लरमध्ये झालेल्या छापेमारीबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munawar faruqui detained by police from hookah bar in mumbai released later hrc
First published on: 27-03-2024 at 09:35 IST