Superhit Mystery Crime Movie on OTT : बॉलीवूडमध्ये अनेक दमदार क्राईम-थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट बनले आहेत. काही चित्रपटांचा सस्पेन्स प्रेक्षकांना भावतो, तर काहींचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना भुरळ घालतो. तुम्हालाही जर क्राईम थ्रिलर अॅक्शन सिनेमे आवडत असतील तर हॉलीवूडचा एक सिनेमा तुम्ही नक्की पाहायला हवा.
हॉलीवूडमध्ये या जॉनरचे अनेक दमदार सिनेमे उपलब्ध आहेत. या वीकेंडला ओटीटीवर काय पाहावं, असा विचार करत असाल तर आम्ही सांगतोय तो सिनेमा तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या चित्रपटाची कथा आणि ट्विस्ट तुम्हाला आश्चर्यचकित करतील. आता या चित्रपटाचे नाव काय आहे आणि तो कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल ते जाणून घेऊया.
चित्रपटाचे नाव काय आहे?
‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ असे या चित्रपटाचे नाव आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक हॉलीवूड चित्रपट पाहिले असतील, काही रोमँटिक तर काही अॅक्शन चित्रपट असतील. पण आज आम्ही तुम्हाला ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ या क्राइम मिस्ट्री सिनेमाबद्दल सांगतोय. तुम्हाला शेवटपर्यंत लक्ष देऊन हा चित्रपट पाहावा लागेल. कारण शेवटपर्यंत त्यातील ट्विस्ट कळणार नाही. केनेथ ब्रानाघ दिग्दर्शित या चित्रपटात टॉम बेटमन, पेनेलोप क्रूझ, जूडी डेंच, जॉनी डेप आणि जोश गॅड यांच्यासह इतर कलाकारांनी अभिनय केला आहे.
‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ ची कथा
१ तास ५४ मिनिटांच्या ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ या चित्रपटाची कथा काय आहे, ते जाणून घेऊयात. ही कथा एका गुप्तहेर आणि एका खून रहस्याभोवती फिरते. हर्क्यूल पोइरोट नावाचा एक माणूस प्रवास करत असताना त्याला अचानक लंडनला परत बोलावलं जातं. प्रवासादरम्यान, त्याची ट्रेन काही कारणास्तव मधेच थांबते. तो बाहेर जाऊन बघतो, तेव्हा त्याला रुळावर एका प्रवाशाचा मृतदेह आढळतो. पोइरोट प्रकरणाची चौकशी सुरू करतो आणि त्याला जे कळतं ते प्रचंड धक्कादायक असतं.
कुठे पाहता येईल हा चित्रपट?
‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. तो जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.