Vanvaas on OTT : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘वनवास’ चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार आहे. उत्कर्ष शर्मा व सिमरत कौर हे कलाकार असलेला ‘वनवास’ चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. ‘पुष्पा २’ व ‘मुफासा’ या चित्रपटांच्या क्रेझमध्ये ‘वनवास’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. अखेर ३ महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर पाहता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गदर २’ चा दिग्दर्शक अनिल शर्माचा ‘वनवास’ चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप ठरला होता. ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘वनवास’ने बॉक्स ऑफिसवर फक्त ४.९५ कोटींचा व्यवसाय केला होता.

‘वनवास’ चित्रपटाच्या भावनिक कथेचे आणि खासकरून नाना पाटेकर यांचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटाची तुलना अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागबान’शी झाली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

कुठे पाहता येणार वनवास?

‘वनवास’ या फॅमिली ड्रामा चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. ‘वनवास’ Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा यांचे एक पोस्टर शेअर करून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ मार्च २०२५ पासून ‘वनवास’ तुम्हाला घरबसल्या पाहता येईल.

‘वनवास’मध्ये नाना पाटेकर वृद्ध विधुर प्रताप सिंघानियाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन होते आणि ते त्या दुःखात असतात. तेव्हा ते आपले घर एका ट्रस्टला दान करण्याचा निर्णय घेतात. त्याचदरम्यान त्यांची मुलं त्यांना वाराणसीमध्ये सोडून देण्याचा कट रचतात. तिथे प्रताप सिंघानिया एका अनोळखी मुलाला भेटतात. तो मुलगा म्हणजे उत्कर्ष शर्माने साकारलेला वीर असतो. वीर कुटुंबापासून दुरावलेल्या प्रताप सिंघानियाची काळजी घेतो आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाजवळ परत नेण्याचं ठरवतो.

‘वनवास’मध्ये नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरन कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सहाय्यक कलाकारांमध्ये खुशबू सुंदर, सिमरत कौर, राजपाल यादव, अश्विनी काळसेकर, परितोष त्रिपाठी, मनीष वाधवा आणि राजेश शर्मा यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar flop film vanvaas ott release update holi 2025 hrc