OTT Releases This Week : ओटीटी हे माध्यम आजच्या काळात मनोरंजनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तरुणांमध्ये याची क्रेझ अधिक असल्याचं दिसतं. अ‍ॅक्शन, हॉरर, लव्हस्टोरी, रहस्यमय असे विविध धाटणीचे चित्रपट ओटीटीमुळे घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतात. चला तर या आठवड्यात कोणते चित्रपट, सीरिज ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत जाणून घेऊ.

विकेंड आला आहे आणि यादरम्यानच काही नवीन चित्रपटदेखील आपल्या भेटीला आले आहेत. चला तर जाणून घेऊयात, या आठवड्यात पाहता येणाऱ्या चित्रपटांची, सीरिजची यादी. या चित्रपटांच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण ते जान्हवी कपूर यांच्या चित्रपटांचा समावेश आहे.

या आठवड्यात ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट

पारिश – ‘पारिश’ एक क्राईम ड्रामा सीरिज आहे. यामध्ये एक माणूस जो गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो व नंतर त्याच्या मुलाचा खून होतो आणि यानंतर या कथेत मोठा ट्विस्ट येतो असं पाहायला मिळतं. हा चित्रपट ‘जिओ हॉटस्टार’वर पाहू शकता.

परम सुंदरी – ‘परम सुंदरी’ हा एक रोमाँटिक चित्रपट आहे. जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्रा यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये एकापेक्षा एक अशी गाणी आहेत. या चित्रपटात परम नावाचा मुलगा, जो सोलमेट नावाच्या एका ॲपच्या संपर्कात येतो; ज्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलतं, अशी गोष्ट पाहायला मिळते. हा चित्रपट ‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Nobody wants this season 2 – ही एक रॉमकॉम सीरिज आहे. या सीरिजमध्ये एक सेक्स पॉडकास्टर आणि एक पुन्हा नव्याने सिंगल असलेली राबी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा काय होतं हे यात पाहायला मिळतं. ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.

कुरुकक्षेत्र पार्ट २ – ही एक ॲनिमेटेड सीरिज आहे, जी महाभारतावर आधारीत आहे. ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.

Pitch to get Rich – हा एक रिॲलिटी शो आहे, जो फॅशनसंबंधित गोष्टींवर आधारित आहे. यामध्ये १४ फॅशन फाउंडर आहेत, ज्यांच्यामध्ये ३० कोटी रुपयांसाठी एकमेकांमध्ये स्पर्धा रंगलेली असते. हे तुम्ही ‘जिओ हॉटस्टार’वर पाहू शकता.

They call him OG – हा अजून एक चित्रपट आहे, जो तुम्हाला पाहायला नक्की आवडेल. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका गँगस्टरवर आधारीत आहे. यामध्ये इमरान हाश्मीदेखील पाहायला मिळतो. ‘नेटफ्लिक्स’वर हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

वश लेवल २ – हा एक सॉयकोलॉजिकल हॉरर, थ्रिलर चित्रपट आहे, जो एका अशा वडिलांवर आधारीत आहे, ज्यांच्या लेकीच्या मृत्यूनंतर त्यांच्यासमोर काही आव्हानं येतात. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.