२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार राव आणि दुल्कर सलमान यांच्या क्राइम कॉमेडी वेब सीरिज ‘गन्स अँड गुलाब्स’ने ओटीटीवर धुमाकूळ घातला होता. नेटफ्लिक्सची ही सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता त्याचा दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राज आणि डीके यांनी ‘गन्स अँड गुलाब्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप मजेशीर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकुमार राव पुन्हा एकदा पाना टिपूच्या भूमिकेतून लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘गन्स अँड गुलाब्स २’च्या माध्यमातून राजकुमार राव व राज आणि डीके हे तिसऱ्यांदा एकत्र येणार आहे. राजकुमार रावने यापूर्वी स्पष्ट केले होते की या दोन निर्माते आणि दिग्दर्शकांच्या जोडीबरोबर काम करणे त्याला प्रचंड आवडते कारण ते कायम हटके आणि ऑफबीट अशा गोष्टी लोकांसमोर घेऊन येतात.

आणखी वाचा : संकर्षण कऱ्हाडेने चोरलेले आजोबांच्या अकाऊंटमधून ३०० रुपये अन्…; अभिनेत्याने सांगितला धमाल किस्सा

या सीरिजच्या पहिल्या सीझनमधील पाना टिपूच्या मजेशीर भूमिकेसाठी राजकुमार रावला अनेक पुरस्कारही मिळाले.’गन्स अँड गुलाब्स’ने प्रेक्षकांना एका रोमांचक आणि अविस्मरणीय असा अनुभव दिला होता. प्रेक्षकांना या सीरिजमध्ये कॉमेडी, अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलर सर्वकाही पाहायला मिळाले. या मालिकेची कथा ९० च्या दशकातील गुलाबगंज या काल्पनिक शहरातील गुन्हेगारी विश्वावर आधारित होती.

प्रेक्षक या सीरिजच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट बघत आहेत. आधीप्रमाणेच या सीरिजमध्ये राजकुमार रावसह गुलशन देवैया, दुल्कर सलमान, श्रेया धन्वंतरी, पूजा गोर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अद्याप याच्या दुसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. २०२४ च्या पहिल्या महिन्यात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkumar rao and raj dk guns and gulaabs season 2 announcement video out avn