रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने जगभरात १०० कोटींची कमाई केली होती. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता अ‍ॅनिमल लवकरच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. अ‍ॅनिमलच्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅनिमल जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. साधारण कोणताही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ४५-६० दिवसांनी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. त्यानुसार जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अ‍ॅनिमल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने पहिल्या आठवड्यातच ३३७.५८ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात १३९.२६ कोटी, तर तिसऱ्या आठवड्यात ५४.४५ कोटींची कमाई केली होती. अ‍ॅनिमलने भारतात आतापर्यंत ५४०.८४ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ८८२.४० कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट ९०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा- “सेक्रेड गेम्सनंतर पॉर्न अभिनेत्री…”, राजश्री देशपांडेचा इंटिमेट सीन्सबद्दल खुलासा; म्हणाली, “कोणीही अनुराग कश्यपला…”

या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून साऊथची सुपरस्टार रश्मिकाने बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले आहे. रश्मिका-रणबीरच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे, तर बॉबी देओलने या चित्रपटात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेचेही कौतुक करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor movie animal ott release date when and where to watch dpj