शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपट जवान ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्य पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली होती. प्रेक्षकांमध्ये जवानची क्रेझ बघायला मिळत आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षक जवानच्या ओटीटी प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- आयुष्मान खुराना खऱ्या आयुष्यात आहे ‘विकी डोनर’, १९ वर्षांपूर्वी स्पर्म केले होते डोनेट

जवान चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘जवान’ची कामगिरी पाहता अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेटफ्लिक्ससोबत २५० कोटी रुपयांचा करार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आधी अॅमेझॉनशी कराराची चर्चा होती, अशातच आता नेटफ्लिक्सचं नाव समोर येतंय. पण अद्याप शाहरुख खानच्या टीमकडून किंवा निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

जवानाची ओटीटी रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. नियमानुसार, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ४ आठवड्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. पण जवानला चित्रपटगृहांमध्ये मिळणार प्रतिसाद पाहता प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर बघण्यासाठी थोडी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- ‘बेटे को हाथ लगाने से पहले…’ ‘जवान’मधील हा डॉयलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, लेखक खुलासा करत म्हणाला, “शाहरुख सरांनी…”

जवानच्या कमाईबाबत बोलायचे झाले तर, या चित्रपटाने सात दिवसांत भारतात ३६८.३८ कोटींची कमाई केली आहे. हिंदीबरोबर या चित्रपटाने तमिळ आणि तेलगूमध्येही चांगला गल्ला जमवला आहे. जगभरात या चित्रपटाने ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan film jawan movie ott release update filmmakers made rs 250 crore deal for ott release with netflix dpj