बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने सगळ्यांची मने जिंकली आहेत. लहानांमुलांपासून मोठ्यांपर्यंत तिचे लाखो चाहते आहेत. आता पाकिस्तान मधील एका रॅपरने आलियावर एक रॅप तयार केला आहे. त्याचा हा रॅप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, आलियाने स्वत: यावर कमेंट देखील केली आहे.
या रॅपरचे नाव मोहम्मद शाह आहे. त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरूवातीला त्याचा मित्र त्याला म्हणतो की, ‘आलियावर गाणं बनव’, त्यानंतर मोहम्मद आलियावर रॅप गातो. रॅपच्या शेवटी त्याचा मित्र त्याला सांगतो की ‘आलियाचा बॉयफ्रेंड आहे, आणि त्याने जान्हवी कपूरवर गाणं बनवायला ट्राय करायला पाहिजे.’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता जान्हवीवर पण लवकरचं गाणं येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘What if चा हा पहिला भाग…’, अशा आशयाचे कॅप्शन मोहम्मदने हे गाणं शेअर करत दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आलिया स्वत: ला थांबवू शकली नाही आणि तिने देखील यावर कमेंट केली. आलियाने गली बॉयमधील ‘बहुत हार्ड’ हा डायलॉग म्हणत मोहम्मदची स्तुती केली आहे.
दरम्यान, करोना निगेटिव्ह आल्यानंतर आलिया आणि बॉयफ्रेंड रणबीर कपूर दोघे ही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव्हला गेले आहेत. तर ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात आलिया पहिल्यांदा रणबीर सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. एवढंच नाही तर आलियाला ‘गंगुबाई’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांमध्ये देखील आपल्याला पाहता येणार आहे.