या दिवशी होणार प्रभासच्या 'आदिपुरुष'चा टीझर प्रदर्शित; तयारीसाठी साऱ्या टीमने गाठलं अयोध्या | prabhaas starrer aadipurush film teaser to be unveiled on second october in ayodhya | Loksatta

‘या’ दिवशी होणार प्रभासच्या ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित; तयारीसाठी साऱ्या टीमने गाठलं अयोध्या

या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

‘या’ दिवशी होणार प्रभासच्या ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित; तयारीसाठी साऱ्या टीमने गाठलं अयोध्या
आदिपुरुष | adipurush

‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांना प्रभासला पुन्हा तशा मोठ्या आणि भव्य अशा भूमिकेत बघायची इच्छा आहे, मध्यंतरी आलेल्या ‘राधे श्याम’ने प्रेक्षकांची निराशा केली. आता मात्र प्रेक्षक त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर अयोध्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होत होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. २ ऑक्टोबरला खुद्द प्रभासच्या हस्ते या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी चित्रपटाची टीम अयोध्यामध्ये असल्याची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार ज्या शहरात प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी हा टीझर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : जेव्हा राम गोपाल वर्मा फोनवर म्हणाले “टायगर श्रॉफ एक स्त्री आहे” आणि विद्युत जामवालने ते रेकॉर्डिंग लीक केलं

मीडिया क्षेत्रातील बरीच मंडळी अयोध्याकडे रवाना झाली असून त्यासाठी सगळेच सज्ज आहेत. याविषयी आणखीन खुलासा करताना चित्रपटाच्या टीमने सांगितलं की “टीझर हा प्रभासच्या हस्ते प्रदर्शित होणार आहे पण त्याबरोबर आणखीन कोणते कलाकार उपस्थित असतील हे सांगता येणं कठीण आहे. आम्हाला आमच्या चित्रपटावर पूर्ण विश्वास आहे.” याबरोबरच लव-कुश रामलीला समितिची प्रमुख अर्जुन कुमार यांनी हे स्पष्ट केलं आहे की ५ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमातही प्रभास सहभागी होणार आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘तान्हाजी’ नंतर हा दूसरा मोठा बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात प्रभासबरोबरच क्रिती सनोन, सैफ अली खान, वत्सल शेठ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“बाबा रुग्णालयात असताना…” राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर मुलीची भावूक प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

‘RRR’, ‘KGF2’वर भारी पडणार ‘हा’ पाकिस्तानी चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ला देणार टक्कर?
“माझ्यावर विश्वास ठेवा मी…” मानसी नाईकच्या पतीच्या पोस्टने वेधले लक्ष
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
Akshaya Hardeek Wedding : “नांदा सौख्यभरे…” अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा विवाहसोहळा संपन्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेची कौशल्य प्रशिक्षण योजना
MCD Election : मतदान यादीतून अनेक नावं गायब…;  ‘आप’ करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार!
Lakshya Sen: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन विरोधात गुन्हा दाखल
“पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”
“अक्कलकोटला गेल्यानंतर मला पहिल्यांदा…” ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव