Prajakta Mali on Bollywood Film Entry : मराठी सिनेसृष्टीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajaktta Mali). प्राजक्ताने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज तिने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्ता सध्या तिच्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने बोल्ड भूमिका साकारली आहे. काही लोकांना तिला ट्रोल केले आहे तर काहींनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. आता प्राजक्ता बॉलिवूडमध्ये दिसणार का? याविषयी तिचं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…”

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड ऑडिशन्स विषयी प्राजक्ताने वक्तव्य केलं आहे. “मला चांगल्या भूमिका हव्या आहेत. मी सहाय्यक भूमिका करू शकत नाही. लोकांनी माझ्यातील कलेला ओळखावं अशी माझी खूप इच्छा आहे. जेव्हा तुम्ही बॉलिवूड चित्रपटात काम करता, तेव्हा देशभरातील प्रेक्षकांना तुमची ओळख होते. त्यामुळे मी माझ्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करतेय. फक्त बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मुख्य अभिनेत्री म्हणून मला काम करायचं आहे. हल्ली हिंदी चित्रपट आणि सीरिजमध्येही आपल्याला अधिकाधिक मराठी चेहरे पहायला मिळत आहेत”, असे प्राजक्ता म्हणाली.

आणखी वाचा : KBC 14 : २ हजाराच्या नोटेत जीपीएस ट्रॅकर? चुकीची बातमी पसरवणाऱ्या न्यूज चॅनेलना अमिताभ यांचा टोला

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

प्राजक्ता आणि तेजस्विनी या दोघींची ‘रानबाजार’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या बोल्ड आणि अत्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यांच्या कामापासून ते त्यांच्या भूमिकेवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali on entering in bollywood and south film industry dcp