‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. गेल्या काही दिवसांपासून या शोच्या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. या सगळ्यात ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो सध्या व्हायरल झाला असून या प्रोमोमध्ये चुकीची बातमी देणाऱ्या न्यूज चॅनेलना अमिताभ यांनी टोला लगावला आहे.

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला अमिताभ हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाला प्रश्न विचारतात की, यापैकी कशात जीपीएस ट्रॅकर आहे. नेहमी प्रमाणे या प्रश्नासाठी देखील ४ ऑप्शन देण्यात आले. पहिला पर्याय होता A) टाइपरायटर, B) दूरदर्शन, C) उपग्रह, D) २ हजार रुपयांची नोट. स्पर्धेक असलेल्या गुड्डी यांनी उत्तर दिले की, २ हजारची नोट निवडते. २ हजारच्या नोटमध्ये जीपीएस तंत्रज्ञान आहे. त्यावर अमिताभ बच्चन गुड्डी यांना म्हणतात की, तुमचे उत्तर चुकीचे आहे.

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

आणखी वाचा : लग्नानंतर पतीसोबत तिरुपतीला गेलेली नयनतारा अडकली वादाच्या भोवऱ्यात!

हे ऐकल्यानंतर गुड्डी यांना आश्चर्य होते आणि त्या म्हणतात, “तुम्ही खोटं बोलत आहात ना?” यावर अमिताभ म्हणतात की, “मी खोटं बोलत नाहीये. तुमचे उत्तर खरोखरच चुकले आहे.” त्यानंतर गुड्डी पुढे म्हणतात, “मी टिव्हीवरील बातम्यांमध्ये ऐकले होते की, २ हजारच्या नोटमध्ये जीपीएस ट्रॅकर आहे.” उत्तर देत अमिताभ म्हणाले की, “आपण जे ऐकतो त्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता, आपण जे ऐकतो ते एकदा तपासून पाहा.” हा प्रोमो पाहिल्यानंतर

आणखी वाचा : गुटखा खाण्याची प्रॅक्टिस! भूमिकेसाठी प्राजक्ता माळीने केली अशी तयारी

‘कौन बनेगा करोडपती’ची ऑन एअर डेट अजून जाहिर झालेली नाहीये. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा शो प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.