“ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाला…” प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

‘धर्मवीर’ चित्रपटात प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे.

prasad oak, dharmaveer, prasad oak instagram post, 50 weeks of dharmaveer, anand dighe, प्रसाद ओक, प्रसाद ओक इन्स्टाग्राम, धर्मवीर, धर्मवीर आनंद दिघे, धर्मवीरचे ५० आठवडे
प्रसाद ओकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

मराठी अभिनेता मागच्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वीच त्याचा ‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला आता ५० आठवडे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्तानं प्रसाद ओकनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. प्रसाद ओकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाला ५० आठवडे पूर्ण झाल्यानंतर प्रसादनं इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं, ‘२०२२ मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार.’ आपल्या या पोस्टमधून प्रसाद ओकनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा- “आता आम्ही न घाबरता…” एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची पोस्ट चर्चेत

दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सध्या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prasad oak post for completing 50 successful week of dharmaveer mrj

Next Story
“आता आम्ही न घाबरता…” एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची पोस्ट चर्चेत
फोटो गॅलरी