प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस त्यांच्या मुलीसह न्यूयॉर्क दोऱ्यावर आहेत. प्रियांकाला संयुक्त राष्ट्र महासभेच्या एका कार्यक्रमामध्ये आमंत्रित केले होते. दरम्यान या कार्यक्रमामध्ये भाषण करताना तिने जगासमोर असलेले प्रश्न मांडले आहेत. भाषणामध्ये तिने “जगात सर्व काही ठीक नाही. आपल्यासमोर असलेली संकटे अचानक आलेली नाहीत आणि योग्य योजना आखून त्या संकटांवर मात करता येईल. ती योजना युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांच्याकडे आहे”, असे वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्रा युनिसेफची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. यामुळे तिला संयुक्त राष्ट्र महासंघाच्या काही कार्यक्रमांमध्ये हजर राहावे लागते. न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये तिच्यासह जगभरातील दिग्गज उपस्थित होते. या दोऱ्यावर तिने तिच्या मुलीला, मालती मेरीला सोबत आणले आहे. तिने लेकीला हातांमध्ये घेत एक गोड फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रियांका सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून तिच्या व तिच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असते. न्यूयॉर्क या शहरामध्ये तिने ‘सोना’ नावाचे रेस्टॉरंट सुरु केले आहे.

हेही वाचा – मोबाईलमधील सिमकार्डपासून बनवला ड्रेस, उर्फीचा नवा अतरंगी अंदाज बघा

संयुक्त राष्ट्र महासंघाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर प्रियांकाने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंडळींसाठी तिच्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी ठेवली होती. या पार्टीमधल्या फोटोंचा एकत्रित केलेला व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसत आहे. पार्टीमध्ये तिने पाणीपुरी खाण्याचा आनंद घेतला. या पार्टीमध्ये निकदेखील सामील झाला होता. तिच्या पार्टीमध्ये त्या दोघांच्या जवळच्या मित्रांना बोलवण्यात आले होते. त्याशिवाय नोबल पुरस्कार विजेती ‘मलाला युसुफ’ याही प्रियांका चोप्राच्या पार्टीमध्ये होत्या. पोस्ट केलेल्या व्हिडीओला तिने माझ्या आवडत्या लोकांसोबतची न्यूयॉर्क शहरातील रात्र असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – सिनेमाच घडतोय जॉनी डेपच्या आयुष्यात; अँबर हर्डशी घटस्फोटानंतर पडला वकिलाच्या प्रेमात

दरम्यान प्रियांका आणि मलाला युसुफ यांचा पार्टीमधला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra enjoyed panipuri with husband nick jonas at her sona restaurant yps