‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ फेम हॉलिवूड अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्ड आणि त्याच्यातील मानहानी दाव्याच्या खटल्यामुळे त्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता जॉनी डेप पुन्हा प्रेमात पडल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे एका खटल्यात कोर्टात जॉनी डेपची बाजू सांभाळलेल्या वकील तरूणीला तो डेट करत आहे.

जॉनी डेप डेट करत असलेल्या वकील तरूणीचं नाव जोएल रिच असं आहे. ती विवाहित असून तिला दोन मुले आहेत. जोएल रिच नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन वेगळं होण्याच्या तयारीत आहे. जॉनी डेपच्या घटस्फोटाच्या खटल्यातील वकिलांच्या टीममध्ये जोएलचा सहभाग नव्हता. तर २०१८ साली ‘सन’ वृत्तपत्राच्या खटल्यात तिने जॉनी डेपची बाजू सांभाळली होती.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

हेही वाचा >> ‘ब्रह्मास्र’साठी किती मानधन घेतले?, रणबीर कपूरने केला खुलासा, म्हणाला…

मीडिया रिपोर्टनुसार, या खटल्यादरम्यानच जॉनी डेप आणि जोएल रिच एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्यात चांगली मैत्री असून ते बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याच्याही ते गांभीर्याने विचार करत आहेत.

हेही पाहा >> Photos : ब्रालेट टॉप आणि साडीत अक्षयाच्या कातिल अदा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुंदरा मनामध्ये भरली’

जॉनी डेपचं नाव सुरूवातीला कॅमिली वास्क्वेझ हिच्याशी जोडले गेले होते. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्ड आणि जॉनी डेप यांच्यातील मानहानी खटल्याची बाजू तिने सांभाळली होती. या खटल्याचा निकाल जॉनी डेपच्या बाजूने लागला होता. जॉनी डेपने मिळवलेल्या विजयात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आपल्याबद्दल सुरु असलेल्या अफवांवर थेट स्पष्टीकरण देत, कॅमिलीने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.