बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने ३ वर्षांपूर्वी अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. या दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचा फरक आहे. प्रियांका निकपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. प्रियांकाने लग्न हे परदेशात नाही तर आपल्या देशातच केले आहे. प्रियांकाने राजस्थानच्या उदयपुरमध्ये निकसोबत लग्न केले. तिचे हे शाही लग्न लोकांच्या अजूनही लक्षात आहे, एवढंच नाही तर त्याचे फोटो देखील अजून व्हायरल होतात. मात्र, या शाही लग्नात किती खर्च झाला आणि हा खर्च कोणी केला? याविषयी प्रियांकाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने तिच्या लग्नाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘आमच्या लग्नात झालेला संपूर्ण खर्च एकतर्फी नव्हता, तर संपूर्ण लग्नात जो खर्च होता तो दोन्ही बाजूंनी केला होता. निक आणि मी लग्नाचा संपूर्ण खर्च वाटून घेतला होता. पण फक्त एका गोष्टीसाठी फक्त निकने खर्च उचलला. ते म्हणजे, साखरपुड्याची अंगठी निक स्वत: घेऊन आला होता. आम्ही लग्नाची तयारी करत असतानाच सगळ्या गोष्टी ठरवल्या होत्या. यात दागिण्यांपासून कपड्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या,’ असे प्रियांका म्हणाली.

आणखी वाचा : KBC 13: ‘या’ प्रश्नाचं उत्तर देत सौरव गांगुली आणि सेहवागने जिंकले २५ लाख; तुम्हाला उत्तर माहितीये का?

आणखी वाचा : KBC 13: सौरव गांगुली आणि सेहवागला धोनीशी संबंधित ‘या’ प्रश्नाचे देता आली नाही उत्तर, घ्यावी लागली एक्सपर्टची मदत

प्रियांका आणि निक यांनी उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेने लग्न केले. त्यांच्या लग्नाचा खर्च हा ३ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. लग्नात प्रियांकाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर ख्रिश्चन लग्नात तिने पांढरा गाऊन घातला होता. दरम्यान, प्रियांका गेल्या अनेक दिवसांपासून सोना या तिच्या रेस्टॉरंटमुळे चर्चेत होती. यंदाच्या वर्षीच मार्चच्या अखेरीस तिचं हे रेस्टॉरंट सुरु झालं आहे. प्रियांका लवकरच ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra reveals about her marriage expenses after 3 years of wedding with nick jonas dcp