बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्रियांका फक्त अभिनयसाठीच नाही तर तिच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी ही ओळखली जाते. प्रियांकाच्या मुलाखती या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. बऱ्याचवेळा तिचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. प्रियांकाची अशीच एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
प्रियांकाने व्होगला नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रियांकाने जॉबसाठी इंटरव्यू देताना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. ‘तुला कधी सुपरहीरो असल्यासारखे वाटले?’ असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता. ‘जेव्हा पॅन्टवर सुपरमॅनप्रमाणे अंडरवेअर परिधान केली होती तेव्हा मला सुपरहीरो असल्यासारखे वाटले,’ असे प्रियांका म्हणाली.
आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा
आणखी वाचा : अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ आता काय करतात?
प्रियांका लवकरच फरहान अख्कर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील असणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका ‘मॅट्रिक्स ४’, ‘टेक्ट फॉर यू’ आणि ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.