ps 1 film is getting huge response for advance booking in abroad rnv 99 | 'पोन्नियिन सेलवन' चित्रपटाची सातासमुद्रापार क्रेझ, परदेशातील अॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी | Loksatta

‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटाची सातासमुद्रापार क्रेझ, परदेशातील अॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले ‘इतके’ कोटी

या चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्तिच्या कादंबरीवर आधारित १० व्या शतकातल्या चोळ साम्राज्याच्या इतिहासावर बेतलेली असणार आहे.

‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटाची सातासमुद्रापार क्रेझ, परदेशातील अॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले ‘इतके’ कोटी

‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. दिग्दर्शक मणीरत्नम यांचा हा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्तिच्या कादंबरीवर आधारित १० व्या शतकातल्या चोळ साम्राज्याच्या इतिहासावर बेतलेली असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून अंदाज येत आहे की फार मेहनत घेऊन हा गौरवशाली इतिहास लोकांपुढे आणायचा प्रयत्न केला गेला आहे.

आणखी वाचा : “आम्ही तुला गमावले…” लाडक्या श्वानाच्या निधनानंतर अजय देवगण भावूक

फक्त भारतातच नव्हे तर जगभरात ‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. परदेशात या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. या दोन्ही ठिकाणी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत या चित्रपटाने केवळ अॅडव्हान्स बुकिंगमधून ३ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर सिंगापूरमध्ये सुरु असलेलं या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंगदेखील सकारात्मक आहे.

भारतामध्ये या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग २४ सप्टेंबरपासून सुरु झालं. भारतातही या चित्रपटाची खूप क्रेझ दिसून येत आहे. भारतातही या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून १.४६ कोटी कमावले आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर तुफान हिट झाला. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटाची चर्चा निर्माण झाली.

हेही वाचा : ऐश्वर्याच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ; ‘पोन्नियिन सेलवन’ सिनेमातील लूक रिलीज

३० सप्टेंबरला ‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये विक्रम बाबू, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज, रवि, तृषा आणि शरद कुमार हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा

संबंधित बातम्या

“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम
हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ; जंगी विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
‘कांतारा’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांची तुलना योग्य की अयोग्य? वाचा नेटकरी काय म्हणतात
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN: “निश्चित-अनिश्चिततेच्या खेळात तुम्हाला अनपेक्षिततेची…” भारताच्या पराभवावर केएल राहुलने सोडले मौन
मुंबई: दुचाकीच्या धडकेने ५६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू ; दुचाकीस्वाराला अटक
‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल
दिग्दर्शक रवी जाधव अडकला पुन्हा लग्नबंधनात; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
पिस्त्याचे सेवन ‘या’ ५ त्रासांच्या वाढीला देते तुफान वेग; एका दिवसात किती व कसे पिस्ते खाणे आहे योग्य?