सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींना वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल केलं जातं. कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी त्यांच्या लूकमुळे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’ मधील स्पर्धक उर्फी जावेद तिच्या लूकमुळे चांगलीच ट्रोल होत आहे. त्यानंतर आता अभिनेत्री राधिका मदानला नेटकऱ्यांनी तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं आहे.

राधिका लवकरच ‘शिद्दत’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात राधिकासोबत अभिनेत सनी कौशल मुख्य भूमिकेत दिसेल. एक ऑक्टोंबरला हा सिनेमा ‘डिन्से हॉटस्टार’ वर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या एका प्रमोशन इव्हेंटवेळी राधिका आणि सनीला स्पॉट करण्यात आलंय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. यात सनी कॅज्युअल लूकमध्ये दिसतोय. तर राधिकाने साइड स्लिट असलेली पॅन्ट परिधान केली असून त्यावर एक ब्रालेट सारखं अत्यंत तोकडं टॉप परिधान केल्याचं दिसतंय. मात्र राधिकाचा हा लूक नेटकऱ्यांना चांगलाच खटकला आहे. या लूकवरून नेटकऱ्यांनी राधिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

हे देखील वाचा: “…हात नका लावू माझ्या साडीला”; माधुरी दीक्षितसह यामी गौतम आणि जॅकलीनने मराठी गाण्यावर धरला ठेका

राधिकाच्या या व्हायरल व्हिडीओवर एक युजर कमेंट करत म्हणाला, “भावा तुझा शर्ट जरा तिला दे तिला गरज आहे” तर दुसरा  युजर म्हणाला, “बकवास ड्रेस” आणखी एक युजर म्हणाला, “तिला देखील उर्फी जावेदप्रमाणेच एका डिझायनरची गरज आहे.” तर एक नेटकरी म्हणाला, ” तिने हे काय घातलंय अंतर्वस्त्र?”

पहा फोटो: ‘टप्पू जोमात जेठालाल कोमात’; बबीताजी आणि टप्पूच्या रिलेशनशिपच्या चर्चांनंतर जेठालालचे मीम्स व्हायरल

(Photo-Instagram@viralbhyani)

राधिकाने परिधान केलेल्या या टॉपमुळे तिला चांगलच ट्रोल व्हाव लागलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी राधिका या टॉपमध्ये कम्फर्टेबल नसूनही तिने हे टॉप केवळ फॅशनसाठी घातल्याची टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडलेली अभिनेत्री उर्फी जावेदला कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं होतं. उर्फीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी तिने परिधान केलेल्या क्रॉप डेनिम शर्टमधून तिची ब्रा स्पष्ट दिसत असल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.