Superstar Rajinikanth’s Daughter Soundarya Shared A Post : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा बुप्रतिक्षित ‘कुली’ चित्रपट नुकताच १४ ऑग्स्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सध्या अनेक जण त्यांच्या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. अशातच आता त्यांच्या लेकीनेही वडिलांसाठी खास पोस्ट केली आहे.

रजनीकांत यांची मोठी मुलगी सौंदर्या रजनीकांत हिने वडिलांचं कौतुक करत त्यांच्या ‘कुली’ चित्रपटासंदर्भात पोस्ट केली आहे. सौंदर्याने एक्सवर ही पोस्ट केली आहे. वडिलांबद्दल ती पोस्टमधून म्हणाली, “५० वर्षे झाली अप्पा, तुम्ही फक्त या सिनेसृष्टीचा भाग नव्हता तर तुम्ही या इंडस्ट्रीला आकार दिला आहे. इंडस्ट्रीला अशा जागी नेऊन ठेवलंत, जिथे ती कधीच नव्हती. तुम्ही कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. तुम्ही दर्जेदार काम केलं आणि या इंडस्ट्रीतील महत्त्वाचा भाग बनलात.”

रजनीकांत यांच्या लेकीने केलं ‘कुली’ चित्रपटाचं कौतुक

वडिलांबद्दल सौंदर्या पुढे म्हणाली, “मला तुमचा अभिमान वाटतोय आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे… ‘कुली’ चित्रपटातील शेवटचा दहा मिनिटांचा फ्लॅशब्क अजूनही माझ्या डोक्यात घुमतोय. मी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणार आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट वडील आहात. थलाईवर निरंधरम.” यावेळी तिने ‘कुली’ चित्रपट पाहात असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

रजनीकांत यांच्यासाठी हा दिवस अजून एका गोष्टीसाठी खास आहे. याचं कारण असं की, १४ ऑग्स्टला त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यांना इंडस्ट्रीत ५० वर्षेसुद्धा पूर्ण झाली आहेत. यानिमित्त इंडस्ट्रीतील इतर अनेक कलाकारांनी रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे.

रजनीकांत यांच्या लेकीबद्दल बोलायचं झालं, तर सौंदर्या ही त्यांची मोठी मुलगी असून त्यांना दोन मुली आहेत. सौंदर्या रजनीकांत आणि ऐश्वर्या रजनीकांत अशी त्यांची नावं आहेत. ऐश्वर्या रजनीकांत ही पार्श्वगायिका व दिग्दर्शिका आहे, तर सौंदर्या दिग्दर्शिका व निर्माती आहे.

दरम्यान, ‘कुली’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नागार्जून, आमिर खान, श्रुती हासन यांसारखे अनेक कलाकार आहेत. लोकप्रिय कलाकारांची फौज असलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.