अभिनेत्री राखी सावंत सध्या आदिल खान दुर्रानीबरोबरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आदिल हा बिझनेसमन आहे. हल्ली तर दोघेही एकमेकांबरोबरच दिसतात. आदिलही मीडियाशी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलत असतो. राखी आणि आदिलचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि वेळोवेळी ते त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. राखी आणि आदिलचा एक म्युझिक अल्बमही रिलीज झाला आहे. त्यावेळच्या शूटिंगचा किस्सा राखीनं सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : आर्यन खानला चाहत्याने दिला गुलाब, पुढे त्याने केलेल्या कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

राखीच्या आयुष्यात आदिल आल्यावर तिचं आयुष्यच बदललं आहे. आदिल हा राखीच्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहे. राखी आदिलबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यापासून पूर्वीसारखे बोल्ड आउटफिट्स कॅरी करत नाही. ती नॉर्मल ड्रेसमध्ये दिसते. राखीने काय कपडे घालायचा हे आदिलच ठरवतो. आदिल आणि त्याच्या कुटुंबाला राखीने ग्लॅमरस आणि शॉर्ट ड्रेस घातलेले आवडत नाही. त्यामुळे तिने नॉर्मल आणि सिंपल ड्रेस घालायला सुरुवात केली. याशिवाय तो राखीची सर्वातोपरी काळजी घेतो.

आता राखीने म्युझिक अल्बमच्या गाण्याच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, “तू मेरे दिल मे रहने लायक नही या गाण्याचं शूट सुरू होतं. राखी आणि गाण्यातला व्हिलन यांचा रोमँटिक सीन होता. आदिलला याची अजिबात कल्पना नव्हती. या सीनमध्ये राखी आणि खलनायकाचा रोमान्स पाहून हिरो दु:खी होतो आणि निघून जातो, असं आहे. ठरल्याप्रमाणे सीन सुरू झाला. शूटिंग सुरू झालं. माझा आणि खलनायकाचा रोमान्स सुरू झाला. आदिल तिथेच होता. त्याला हे पाहून धक्का बसला आणि रागही आला. त्यानं लगेच पुढे येऊन या गाण्यातील खलनायकाशी मारामारी करायला सुरुवात केली. त्यावेळी राज सरांनी आदिलला शांत केलं.”

हेही वाचा : फक्त ५० रुपयांसाठी अनिल अंबानींच्या लग्नात जेवण वाढायला गेली होती ‘ही’ अभिनेत्री; आता आहे कोट्यवधींची मालकीण

‘तू मेरे दिल मे रहने लायक नही’ हे गाणे प्रदर्शित झालं. त्यात राखी आणि आदिलची केमिस्ट्री चांगलीच रंगली आहे. या गाण्याला राखीच्या चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. यानिमित्ताने आदिल अभिनय करू शकतो, हेही सगळ्यांना कळलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant boyfriend fight when he saw rakhi doing romance with another man rnv