बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर हा कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी रणवीरच्या चाहत्यांसाठी एक वेगळी आणि आनंदाची बातमी आहे. रणवीर आता बेअर ग्रिल्सच्या शोच्या चित्रीकरणासाठी नुकताच परदेशात रवाना झाला आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अॅडव्हेंचर करताना दिसरणार आहे. नेटफ्लिक्सशी चर्चा केल्यानंतर बेअरने रणवीरला या शोसाठी विचारले होते. रणवीर या शोसाठी उत्साही आहे. या शोचा बिग बजेट आहे. यावेळी ते पूर्वेकडील युरोपियन देशामध्ये या शोचे चित्रीकरण होणार आहे.
आणखी वाचा : जॅकलिनने पुन्हा एकदा केल टॉपलेस फोटोशूट, पाहा फोटो
आणखी वाचा : राजस्थानहून भेटवस्तू घेऊन आला चाहता, पण जान्हवीची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल
दरम्यान, रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ‘सर्कस’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.