बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंग. रणवीरने त्याच्या स्वबळावर या क्षेत्रात आपली जागा निर्माण केली आहे. तो वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाबरोबरच तो अतरंगी पेहरावासाठी आणि त्याच्या एअरपोर्ट लूक्ससाठी ओळखला जातो. तो त्याच्या लूक्ससोबत वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि यासाठी त्याला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे. रणवीरचा असाच एक लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
रणवीर सिंगला हैदराबादला जाताना विमानतळावर स्पॉट करण्यात आले. त्यावेळेस त्याच्या अनोख्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. बॉलिवूड पॅपने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याचा हा अनोखा लूक पहायला मिळत आहे. त्याच्या या नवीन लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यावेळेस रणवीरने परिधान केलेल्या पेहरावासाठी नव्हे तर त्याने वेगळ्या पद्धतीने बांधलेल्या केसांची चर्चा होत आहे. रणवीरने यात फॉर्मल पॅन्ट आणि ब्लेझर परिधान केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यावेळेस रणवीरने एका खाली एक असे दोन बो बनले असून या लूकची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
हैदराबादमध्ये रणवीरने अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा आडवाणीच्या आगामी चित्रपटाच्या लाँच इव्हेंटसाठी हजेरी लावली. रणवीरच्या या अनोख्या लूकवर नेटकरी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसले. रणवीर सिंगने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत.’पद्मावत’ या चित्रपटामधली त्याच्या खिलजी या भूमिकेसाठी त्याचे कौतुक करण्यात आले आहे. आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर रणवीर दीपिकासोबत ‘८३’ या चित्रपटात काम करणार आहे. याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून प्रेक्षक या चित्रपटाची अतुरतेने वाट बघत आहेत.