टिव्ही क्षेत्रातील ‘किन्नर बहू’ नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रूबीना दिलैक ही सुद्धा करोनाच्या विळख्यात सापडली आहे. करोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिनं स्वतःला १७ दिवसांसाठी आयसोलेट करून घेतलंय. अभिनेत्री रूबीनाला करोना झाल्याचं कळल्यानंतर तिचा पती अभिनव शुक्लाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय.
रूबीनाचा पती अभिनव सध्या एका कामानिमित्त पंजाबमध्ये आहे. पत्नी रूबीनाने स्वतःला आयसोलेट करून घेतल्याने पती अभिनव शुक्ला तिला मिस करतोय. नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर कोलगेट आणि टूथब्रशचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. ‘तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे, लवकर बरी हो’, असं म्हणत या पोस्टमध्ये त्याने पत्नी रूबीनाला देखील टॅग केलंय.
ही पोस्ट पाहून अभिनेत्री रूबीना भावूक झाली आणि तिने यावर दुःखी स्माईली जोडत रिप्लाय दिला. ही पोस्ट पाहून दोघांचीही जवळची मैत्रिण निक्की तांबोळी ही भारावून गेली. अभिनेत्री रूबिनाला टॅग करत लवकरात लवकर बरी हो, असं तिने यात लिहिलंय. किर्ती केळकर आणि राहूल महाजन हे देखील त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत. या दोघांनीही अभिनेत्री रूबिना लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.
गेल्या शनिवारी अभिनेत्री रूबीना दिलैक हीने तिच्या प्रकृतीची माहिती दिली. तिनं लिहिलं, “सध्या करोना संक्रमित असल्याचा अनुभव घेतेय..एक महिन्यानंतर बरी होऊन प्लाझ्मा दान करू शकणार आहे…अखेर करोना पॉझिटीव्ह आले…’. पुढे लिहिताना तिनं १७ दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाल्याचं सांगितलं. तसंच जे जे कोणी तिच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःची करोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहनही तिनं केलं.