बॉलिवूडची बहुचर्चित जोडी कतरिना आणि रणबीरने माध्यामांबरोबरचा लपाछपीचा खेळ बाजूला सारलेला दिसतोय. रविवारी (१० नोव्हेंबर) रात्री उशिरा दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत हे दोघे एकत्र दिसले. ‘बॉम्बे वेल्वेट’ या आगामी चित्रपटात व्यस्त असलेला रणबीर डेनिम जिन्स आणि जॅकेटमध्ये आपल्या नेहमीच्या कुल अंदाजात दिसत होता, तर कतरिनाने फुलांची प्रिंट असलेला शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.
अलिकडेच बेरुटमधील आपले शूटिंग पूर्ण करून भारतात परतलेली कतरिनासुध्दा खूप खुश दिसत होती. आपल्या रिलेशनशीपबाबत उघडपणे काहीही न बोलणाऱ्या या दोघांमध्ये माध्यामासमोर एकत्र येतांना जरासुध्दा संकोच दिसत नव्हता. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी आयोजीत केलेल्या दिवाळी सेलिर्बेशनसाठी हे दोघे एकत्र आले होते. करण जोहरच्या या पार्टीत बॉलिवूडमधील करीना कपूर, सिध्दार्थ मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूर अशी अनेक मंडळी उपस्थित होती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2013 रोजी प्रकाशित
करणच्या पार्टीत रणबीर-कतरिना पुन्हा दिसले एकत्र
बॉलिवूडची बहुचर्चित जोडी कतरिना आणि रणबीरने माध्यामांबरोबरचा लपाछपीचा खेळ बाजूला सारलेला दिसतोय. रविवारी (१० नोव्हेंबर) रात्री उशिरा दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत हे दोघे एकत्र दिसले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-11-2013 at 06:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumored couple rambir kapoor katrina kaifs midnight date