बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. सलमान खानने शुक्रवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सूरज पंचोलीबरोबर मोशन क्लिप्सचा एक कोलाज शेअर केला आहे.
सूरज ‘केसरी वीर’ चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे सलमानची ही पोस्ट त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. सलमानची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. सूरजचा ‘केसरी वीर’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तो त्याच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. सलमानबरोबरचा त्याचा हा फोटो व्हायरल होत आहे.
सलमानची पोस्ट व्हायरल
सलमान खानने सूरज पंचोलीबरोबर चेहरा झाकलेला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही टेबलवर डोके खाली ठेवून बसले आहेत. पोस्ट शेअर करताना सलमानने लिहिले- “आता रात्र झाली आहे. सकाळी सूर्य उगवेल.”
सलमानच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट्स करीत आहेत. ते सलमानवर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत. एकाने लिहिले- लव्ह यू भाईजान. दुसऱ्याने लिहिले- रॉकस्टार सलमान खान. त्याचे चाहतेही त्याच्या भावना समजून घेऊन, त्याच्यावर प्रेमाचा खूप वर्षाव करीत आहेत.
अलीकडेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दोन वेगवेगळ्या घटना घडल्या, ज्यामुळे सलमानची Y+ सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. काल पुन्हा एकदा सलमान खानच्या घरात एक व्यक्ती घुसल्याचे प्रकरण समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० मे रोजी घडली. गुरुवारी याबाबतचा खुलासा झाला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
२३ वर्षीय आरोपीचे नाव जितेंद्र कुमार आहे आणि तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. दोन दिवसांत घडलेली ही दुसरी घटना होती. याआधी ईशा छाब्रा नावाच्या महिलेनेही गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. तिला पोलिसांनी अटक केली. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.
सूरज पंचोली ‘केसरी वीर’ चित्रपटातून बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. चित्रपटातील त्याचा लूक खूप पसंत केला जात आहे. सर्व जण त्याचे कौतुक करीत आहेत. चित्रपटात सूरजबरोबर सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय व आकांक्षा शर्मा महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. हा चित्रपट प्रिन्स धीमान यांनी दिग्दर्शित केला आहे. आता सूरजचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धमाल करू शकतो हे पाहावे लागेल.