बॉलीवूडच्या आगामी ‘सुलतान’ या चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानचा नवा लूक प्रदर्शित झाला आहे. सध्या ‘सुलतान’चे चित्रीकरण सुरू असून या भूमिकेसाठी सलमान व्यायामशाळेत बरीच मेहनत घेत आहे. चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी जीममधील त्याचे एक छायाचित्र ट्विट केले आहे. यामध्ये सलमानच्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडत आहे. मात्र, सलमानच्या या पिळदार शरीरयष्टीचे गुपित फोटोशॉपमध्ये दडल्याचा आरोप ट्विटरवर काहीजणांकडून करण्यात येत आहे. टीझर आणि पोस्टरमधील सलमानचे शरीर ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ते पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सलमानने सुलतानच्या फर्स्ट लूकचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले होते. पण पोस्टर आणि टीझरमध्ये दिसत असलेल्या सलमानच्या पीळदार शरीरासाठी फोटोशॉपचा वापर करण्यात आल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे.