सल्लुमियाँच्या ‘किक’ने पाकिस्तानमध्ये सुट्टीच्या दिवसांतील चित्रपटांच्या कमाईचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पाकिस्तानमध्ये ‘किक’ने ईदसह सुट्टीच्या दिवसांत तब्बल २.०८ कोटींची कमाई करत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळे कराची भागातील चित्रपटगृहांमध्ये ‘किक’च्या शोची संख्या वाढवण्याची वेळ आली. आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही चित्रपटाला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाकिस्तानमधील अनेक चित्रपटगृहांचे मालक सांगत आहेत. सुट्टीच्या दिवसांतील ‘किक’चा जोर बघता, या चित्रपटाच्या प्रत्येक शो मागे चित्रपटगृहाच्या मालकांना तब्बल ६५,००० ते ७०,००० हजारांचा नफा झाला. ईदच्या मुहूर्तावर कराचीतील ५८ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’ने कमाईचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्डस मोडीत काढले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans kick highest holiday grosser in pakistan