अभिनेत्री समीरा रेड्डी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समीरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकवेळा ती सोशल मीडियाच्य माध्यमातून चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल सांगताना दिसते. आता एका मुलाखतीत समीराने मुलगा हंसच्या जन्मानंतर ती नैराश्येत गेल्याचे सांगितले आहे.

नुकतीच समीराने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत समीराने गर्भवती असताना तिने नैराश्याचा सामना केल्याचे  सांगितले आहे. तिचा नवरा अक्षय वर्देने मुलाचे डायपर बदलण्यापासून त्याला खायला मिळेल ही देखील काळजी घेतली. “माझी सासू मला म्हणाली, तुझं बाळ निरोगी आहे, तुझा नवरा तुझी साथ देतो, मग तू एवढी काळजी का करते? माझ्याकडे उत्तर नव्हते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी रडले. हंससोबत नसल्याने स्वत: ला दोषी समजतं होते. या गोष्टी संपूर्ण एक वर्ष सुरु होत्या. मी बऱ्याच वेळा हरले. मी चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर झाले होते. माझे वजन हे अजूनही १०५ किलो होते आणि मला Alopecia areata म्हणजेच डोक्यावरचे केस गळण्याची समस्या झाली होती,” असे समीरा म्हणाली.

समीरा पुढे म्हणाली, “सगळीकडून अदृश्य झाल्यानंतर मी सोशल मीडियावर सक्रिय झाले. तेव्हा देखील, आपण मम्मी होणार आहात की पुन्हा सेक्सी सॅम होणार? असे प्रश्न विचारण्यात येत होते. पण मला फॉलोवर्स मिळावे म्हणून मी खोटे बोलली नाही. तर, मी माझ्या समस्यांबद्दल बोलू लागले. सुरुवातीला मी चांगली दिसतं नव्हते म्हणून मला ट्रोल करण्यात आले, परंतु यामुळे मला त्रास झाला नाही. २०१८ मध्ये मी पुन्हा एकदा गर्भवती होती तेव्हा मी स्वत:ला सांगितले की मी यासाठी तयार आहे.”

दुसऱ्यांदा गर्भवती असताना समीरा ही ४० वर्षांची असल्याने ती थोडी घाबरलेली होती. ती जाड होती तरी देखील तिला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या ज्या तिने पहिल्यांदा गर्भवती असताना केल्या नाही. समीरा जेव्हा ८ महिन्याची गर्भवती होती. तेव्हा तिने अंडरवॉटर बिकीनी शूट केले होते. त्यानंतर समीराकडे अनेक स्त्रीया आल्या आणि म्हणाल्या, ‘तू आमच्यासाठी प्रेरणा आहेस.’

दरम्यान, समीराने २००२ मध्ये सोहेल खान सोबत ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. समीराने हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. समीराने २०१४ मध्ये बिजनेसमॅन अक्षय वर्देशी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव हे हंस आणि मुलीचे नाव नायरा आहे.