‘बॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खानची पत्नी गौरी खान लवकरच एक इंटेरिअर डिझाईन स्टोअर सुरू करत आहे. स्टोअर सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुंबईमध्ये सुरू होणाऱ्या या स्टोअरचे नाव ‘द डिझाईन सेल’ असे असणार आहे. गौरी सुरू करत असलेल्या या व्यवसायाला शाहरूखने शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले. याबाबत टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात शाहरूख म्हणतो, आधीपासूनच गौरी खानचे हृतिक रोशनची विभक्त पत्नी सुझानबरोबर भागिदारी स्वरुपातील दुकान आहे. परंतु, आता पतीच्या सहकार्याने आणि उत्तेजनेमुळे गौरी खानने तिच्या कलात्मकतेला आणखी पुढे नेत स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा



शाहरूखलासुद्धा गृह सजावटीची आवड असून, त्यानेच आपल्याला या व्यवसायासाठी उत्तेजन दिल्याचे, गौरीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या ‘व्हॅलेंटाइन-डे’च्या आठवणींना उजाळा देताना ती म्हणाली, व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी मी कामात व्यस्त असल्यामुळे मला त्या दिवसाचा विसर पडला. परंतु, त्या दिवशी माझ्या दुकानाबाहेर फुलं, भेट वस्तू आणि एक नवी कोरी फॅन्सी मर्सिडीझ मला दिसली. माझ्यासाठी शाहरूखनं हे सर्व केल्याबद्दल त्याचं कौतुक कराव तेव्हढं थोड आहे.



शाहरूख आणि गौरीचे अन्य जवळचे मित्र फराह खान आणि करण जोहर यांनी सुद्धा तिला नव्या व्यवसायासाठी टि्वटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan congratulates wife gauri on her new start