बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी त्याची चांगली फॅन फॉलोइंग आहे. नुकताच आर्यन खानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात तो आपल्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसून येतोय.
आर्यन खानचा मित्र अभयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आर्यन खान त्याच्या मित्रांसोबत पार्टीत पोज देताना दिसून येत आहे. आर्यन आणि त्याच्या मित्रांनी एक हाऊस पार्टी आयोजित केली होती. त्यावेळचा हा फोटो क्लिक केलाय. या पार्टीमध्ये आर्यन खानने शर्ट आणि पांढरा टी-शर्ट घातला आहे. या फोटोमध्ये आर्यनचे सर्व मित्र खूप आनंदी दिसत आहेत. आर्यनच्या मित्राने ‘होमीज’ असं लिहित हा फोटो त्याला टॅग केलाय. आर्यन व्यतिरिक्त या फोटोमध्ये अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे देखील आहे. यापूर्वीही आर्यन खान त्याच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसला होता.
आर्यन खानहा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. त्याच्या या फोटोवर फॅन्स देखील अगदी मनमोकळ्यापणाने कमेंट्स करताना दिसून येत आहेत. एका स्टार किड असूनही कॅमेऱ्याकडे न पाहण्याचा नियम मोडीत काढल्याचं पाहून फॅन्स त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. या फोटोमध्ये आर्यनने कॅमेराकडे पाहत चेहऱ्यावर शांत हावभाव देत फोटो क्लिक केलाय.
आर्यन खानने जवळपास दोन वर्षांच्या गॅपनंतर 15 ऑगस्ट रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. त्याने याआधी 12 सप्टेंबर 2019 रोजी शेवटची पोस्ट शेअर केली होती. यासोबत त्याने लिहिलं की, ‘ पोस्ट ग्रॅज्यूएशनला विसरून जा. मला असं वाटतं की हे समजायला खूप उशीर झाला आहे.
आणखी वाचा : वीकेंड एन्जॉय करण्यासाठी विद्या बालनचे ‘हे’ आहे आवडतं ठिकाण; तिचं कपाट!
आर्यन खान हा वडील शाहरूख खानप्रमाणे बॉलिवूडमध्ये झळकत नसला तरी त्याचे इन्स्टाग्रामवर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याला 1.4 दशलक्ष इतके लोक फॉलो करत असतात. पण स्वतः आर्यन केवळ 440 लोकांनाच फॉलो करतो. त्याने आतापर्यंत एकूण 24 पोस्ट शेअर केल्या आहेत. 31 डिसेंबर 2013 रोजी पहिली पोस्ट शेअर केली होती. आर्यनने अलीकडेच दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे. त्याने मे मध्ये पदवी मिळवली.