‘क्रिश ३’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, या ‘सुपर-हिरो’ चित्रपटातील शाहरूख खानच्या ‘रेड चिली व्हिएफएक्स’ने कलेल्या ‘स्पेशल इफेक्टस’चे सर्वत्र कौतूक होत आहे. अशात शाहरूखच्या ‘रेड चिली’ कंपनीला अन्य चित्रपटांच्या ‘स्पेशल इफेक्टस’चे काम मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. सलमान खानच्या ‘किक’ या आगामी चित्रपटातील ‘स्पेशल इफेक्टस’चे काम शाहरूख खानची कंपनी करणार असल्याच्या वावड्या बॉलिवूडमध्ये उठत आहेत. पनवेल येथे चित्रीकरण सुरू असलेला साजित नाडियादवालाचा हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. सलमान आणि शाहरूख चित्रपटात एकत्र काम करण्याची सुतराम शक्यता नसली तरी, ‘किक’ चित्रपटाद्वारे ते ‘ऑफस्क्रीन’ एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सलमान ‘किक’ आणि भाऊ सोहेल खानच्या ‘जय हो’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी धावपळ करत आहे, तर शाहरूखची ‘रेड चिली व्हएफएक्स’ फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’वर काम करत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2013 रोजी प्रकाशित
शाहरूखची ‘रेड चीली व्हएफएक्स’ सलमानच्या ‘किक’ चित्रपटातील स्पेशल इफेक्टस् साकारण्याची शक्यता
'क्रिश ३' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, या 'सुपर-हिरो' चित्रपटातील शाहरूख खानच्या 'रेड चिली व्हिएफएक्स'ने कलेल्या 'स्पेशल इफेक्टस'चे सर्वत्र कौतूक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-12-2013 at 08:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans red chillies vfx likely to work on salman khans kick