अभिनेता शाहिद कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांना नुकतेच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर रात्री उशिरापर्यंत एकत्र आढळून आल्याने इंडस्ट्रीत आता शाहिद आणि जॅकलीनमधील ‘लेट नाईट डेटिंग’ची चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद यांच्यातील प्रेमकरणाची चर्चासुद्धा ऐकायला मिळत होती. मात्र, शाहिदला अचानक जॅकलीन फर्नांडिसबरोबर दिसून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शाहिद आणि जॅकलीन रात्री १.३० वाजेपर्यंत रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत बसल्याचे त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांनी सांगितले. त्यानंतर हे दोघे मिळून लॉग-ड्राईव्हला गेल्याचेसुद्धा सांगण्यात येते. यापूर्वी सोनाक्षी सिन्हाचे नाव शाहिद कपूरशी जोडण्यात येत होते. कॉफी विथ करण या कार्य़क्रमातसुद्धा दोघांनी एकत्र हजेरी लावली होती, त्यावेळी सोनाक्षी आणि शाहिदमध्ये असणारी चांगली केमेस्ट्रीसुद्धा बघायला मिळाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2014 रोजी प्रकाशित
शाहिद आणि जॅकलीन फर्नाडिंसचे ‘लेट नाईट डेटिंग’ ?
अभिनेता शाहिद कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांना नुकतेच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर रात्री उशिरापर्यंत एकत्र आढळून आल्याने इंडस्ट्रीत आता शाहिद आणि जॅकलीनमधील 'लेट नाईट डेटिंग'ची चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-05-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor goes for a late night date with jacqueline fernandez