बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमधून शनाया बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे. मात्र बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया तिच्या अभिनयामुळे ट्रोल झाली आहे. शनायाने नुकतचं एका जाहिरातीमधून अभिनयात पाऊल ठेवलं आहे. निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही जाहिरत शेअर केलीय. मात्र या जाहिरातीमधील शनायाचा अभिनय पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.
करण जोहरने एका हेअर स्ट्रेटनरची जाहिरात शेअर केलीय. यात शनाया कपूर हातात एक न्यूडल्सचं बाऊल घेऊन उभी असल्याचं दिसतंय. तर हेअऱ स्ट्रेटनिंगची जाहिरात करताना शनाया न्यूडल्स खाताना दिसतेय. या जाहिरातीला विनोदी स्वरुपात बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी यामुळे नेटकऱ्यांनी शनायाचीच थट्टा केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत शनाया कपूरसोबतच करणला देखील ट्रोल केलंय.
शनाया कपूरचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिची अनन्या पांडेशी तुलना करत ट्रोल केलंय. एक नेटकरी म्हणाला, “दुसरी अनन्या पांडे”, तर दुसरा युजर म्हणाला, “अनन्या पार्ट २” या शिवाय अनेकांनी करण जोहरवर देखील निशाणा साधला आहे. एक युजर म्हणाला, “करण जोहर या सर्वांचा गॉडफादर बनला आहे.” तर आणखी एक युजर म्हणाला, ” कृपा करून जरा चांगल्या टॅलेंटला प्रमोट कर. या मुली खूपच वाईट अभिनेत्री आहेत.”शिवाय अनेक नेटकऱ्यांनी करण जोहरवर पुन्हा एकदा घराणेशाहीवरून टीका केली आहे. तसचं शनाया कपूरने जाहिरातीत ओव्हर अॅक्टिंग केल्याचं म्हणत तिच्यावर निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा: काय बोलता? वेब सीरिज पाहण्यासाठी कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना दिली एका दिवसाची सुट्टी
करण जोहरच्या सिनेमातून शनाय कपूर बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असून या सिनेमात अभिनेता गुरफतेह पिर्झादा आणि लक्ष लालवानी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा एक रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा असेल.