"माझ्या मुलांनी माझ्यासारखे होऊ नये कारण…." अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताने केला खुलासा | Shweta Bachchan admits she is not financially independent hopes Navya and Agastya dont think of getting married nrp 97 | Loksatta

“माझ्या मुलांनी माझ्यासारखे होऊ नये कारण…” अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताने केला खुलासा

तिच्या या खुलासामुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला.

“माझ्या मुलांनी माझ्यासारखे होऊ नये कारण…” अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचे लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत श्वेता बच्चन-नंदा हिने ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्याचे भाष्य केले आहे. तिच्या या खुलासामुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला.

श्वेता बच्चन ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ते नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच श्वेता बच्चनने ‘व्हॉट द हेल नव्या’ या एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या आर्थिक गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, मी आर्थिकदृष्या सक्षम नाही. मी फार महत्त्वकांक्षीही नव्हती. पण माझ्या दोन्हीही मुलांनी म्हणजे नव्या आणि अगस्त्य यांना स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं मला पाहायचं आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

“मी जरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसली तर माझ्या मुलांनी म्हणजेच नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा यांनी योग्य ते पर्याय निवडावे. तसेच लग्नाआधी त्यांनी स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. मी महत्त्वाकांक्षी स्त्री नाही. तसं होण्यासाठी मी कधीही प्रयत्न केला नाही आणि केला नाही. पण माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी माझ्यासारखे होऊ नये.” असे श्वेता बच्चन हिने म्हटले.

आणखी वाचा : शाहरुख खानला दिलासा, चेंगराचेंगरी प्रकरणातील गुन्हा मागे

श्वेता बच्चनने १९९७ मध्ये प्रसिद्ध उद्योजक निखिल नंदासोबत लग्न केले. निखिल आणि श्वेता यांना नव्या आणि अगस्त्य अशी दोन अपत्य आहेत. अगस्त्य नंदा हा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर नव्या नवेली नंदाचे हे पहिले पॉडकास्ट आहे. श्वेताने व्यावसायिक मॉडेल, स्तंभलेखक आणि लेखिका असण्याव्यतिरिक्त एक बिझनेस वुमन म्हणून काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लालबाग-काळाचौकी अन् चाळीतलं घर; कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा खऱ्या आयुष्याबाबत खुलासा

संबंधित बातम्या

Sairat: ‘सैराट’च्या आर्चीची ‘झिंगाट’ कामगिरी
‘सैराट’मधली ती विहीर हीच का?
करिनाला तिच्या बेबीच्या वादग्रस्त नावाची ‘अॅलर्जी’?
त्या दिवशी सलमानचं कुटुंब त्याला कारागृहात भेटायला गेलं आणि…
VIDEO: ‘उल्लू का पठ्ठा’ मध्ये रणबीर- कतरिनाची हटके केमिस्ट्री

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच