बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा नुकताच ‘गहराइयां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कालचं प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळतं आहेत. गेल्या आठवड्यात ‘गहराइयां’ या चित्रपटाची संपूर्ण टीम द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सिद्धांतने त्याच्या ५० वर्षीय काकांनी दीपिकासोबत दिलेल्या सीनवर जो प्रश्न विचारला तो ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना हसू अनावर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिलने यावेळी संपूर्ण टीमला काहीना काही प्रश्न विचारले आहेत. त्यावेळी कपिलने सिद्धांत चतुर्वेदीला विचारतो, “तुझ्याबद्दल अशी अफवा आहे की तू चित्रपट साईन करण्याआधी तुझ्या आई-वडिलांनासोबत स्क्रिप्टवर चर्चा करतोस. तर ट्रेलर पाहिल्यानंतर तुझे वडील म्हणाले, पुढच्या चित्रपटात माझ्यासाठी एक भूमिका ठेव.” हा प्रश्न ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हसू लागले होते.

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

आणखी वाचा : “मी उघड्यावर शौचाला बसलो आणि मागे वळून पाहतो तर हॉलिवूडचे…”, करण जोहरने सांगितला ‘तो’ लाजिरवाणा किस्सा

आणखी वाचा : ‘पुष्पा’च्या श्रीवल्ली गाण्याची परदेशातही क्रेझ, इंग्लिश व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल

यावर सिद्धांत बोलतो असं काही नाही पण मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, “जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हा गावी असलेल्या काकांनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी माझ्या वडिलांना विचारलं की जेव्हा हा किसींग सीन शूट केला तेव्हा स्पर्श झाला की त्यांच्यामध्ये आरसा ठेवण्यात आला होता?” त्यावर मला माझे वडिल म्हणाले, आता याच उत्तर मी काय देऊ?” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhant chaturvedi uncle asked question on kissing scene with deepika padukone in gehraiyaan dcp