दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. सध्या करण हा ‘हुनरबाझ’ या रिअॅलिटी शोचा परिक्षक आहे. यावेळी करणने त्याच्यासह परिक्षकांना म्हणजेच अभिनेत्री परिणीती चोप्राचाआणि मिथुन चक्रवर्तीला ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या शूटिंगचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रोमोच्या सुरुवातीला परिणीती ‘कभी खुशी कभी गम’ हे चित्रपटातली धून गुणगुणताना दिसते. त्यानंतर करण या चित्रपटाच्या शूटिंगचा एक मजेशीर किस्सा सांगताना बोलतो. “आम्ही इजिप्तमध्ये कभी खुशी कभी गम या चित्रपटाची शूटिंग करत होतो. तिथे एक अशी जागा होती जिथे १००-१०० किलोमीटर लांबपर्यंत फक्त लाइमस्टोनचं स्ट्रक्चर होते. एक व्यक्ती नाही. फक्त आम्ही होतो, असं वाटतं होतं की स्वर्गात आहोत. इतकं सुंदर ठिकाण ते होतं. पांढरी रेती, पांढरे लाइनस्टोन स्ट्रक्चर. त्याच दिवशी सकाळी माझं पोट खराब झालं होतं आणि मला लूज मोशन सुरु झाले होते. कुठे तंबू नाही. बाथरुम तर नाहीच नाही. मी विचार करत होतो की आता काय करू? तेव्हा मी विचार केला की कोणत्या मोठ्या लाइमस्टोनच्या मागे जातो आणि आता माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे,” असे करण बोलतो.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार

आणखी वाचा : “अपमानानंतरही अक्षय कुमार जर कपिल शर्मा शोमध्ये आला तर मी…”, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

पुढे करण म्हणाला, “मी तिथे गेलो, सुरुवात केली. तेव्हा मला पाठून आवाज आला. मी वळून पाहिलं तर हॉलिवूडचं एक क्रू त्याच ठिकाणी लोकेश शोधण्यासाठी आलं होतं. तर ते दुसरे लोक जे होते, त्यातल्या जवळपास २० लोकांनी मला पाहिलं. ते मला कॅमेऱ्यातून मला शूट करणार, तितक्यात मी हात जोडून म्हणालो, कृपया माझं शूटिंग करू नका, मी त्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. थोडा आदर करा. त्यांनी माझ्या विनंतीचा मान राखला आणि म्हणाले तुम्ही तुमचा वेळ घ्या, त्यानंतर ते तेथून निघाले.” करणचा हा किस्सा ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हसू लागतात.

आणखी वाचा : “ट्रेनमधून उडी मारायची इच्छा व्हायची…”, मृणाल ठाकूरने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करीना कपूर, अमिताभ बच्चन, जया बच्चन, आलोक नाथ आणि फरीदा जलालसोबत अनेक कलाकार होते. हा चित्रपट आयकॉनिक चित्रपट असून त्याने अनेक रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलवर असलेलं ‘सूरज हुआ मद्धम’ हे गाणं इजिप्तमध्ये शूट करण्यात आलं आहे.