बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असलेलं कपल म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी. सिद्धार्थ आणि कियाराच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत. त्यातच त्यांच्या ‘शेरशहा’ या सनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली असून या सिनेमातील दोघांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडली आहे. या सिनेमाच्या रिलीजनंतर सिद्धार्थ आणि कियाराला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं असून आता त्यांच्या अफेअरच्या चर्चांना अधिक उधाण आलंय.

सिद्धार्थ आणि कियाराच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता कियारा आणि सिद्धार्थचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओला दोघांच्या चाहत्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसतेय. विशेष म्हणजे कियारा आडवाणीनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचा हा खास व्हिडीओ शेअर केलाय. ‘शेरशहा’ सिनेमातील ‘कभी तुम्हे’ या गाण्यावरील रील कियाराने शेअर केलंय. यात दोघांचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतोय.

हे देखील वाचा: “हे खूपच अश्लील आहे”, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सनी लिओनीने दिलेल्या टास्कवर नेटकरी भडकले

हे देखील वाचा: “आम्ही मामा कधी होणार?”; फोटोग्राफर्सच्या प्रश्नावर भारती सिंहने दिलं धमाल उत्तर

या व्हिडीओवर सिद्धार्थ आणि कियाराच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी कियारा आणि सिद्धार्थने लग्न करावं अशी इच्छा व्यक्त केलीय. तर अनेकांनी कियारा आणि सिद्धार्थची जोडी सिनेमातील ऑनस्क्रीन जोडीप्रमाणे प्रत्यक्षातही खूप सुंदर दिसत असल्याचं कमेंटमध्ये म्हंटलं आहे. अद्याप कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीरपणे खुलासा केला नसला तरी चाहत्यांकडून मात्र त्यांच्या जोडीला पसंती मिळताना दिसतेय.

‘शेहशहा’ सिनेमात कारगील युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा वर्णन करण्यात आलीय. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे तर कियारा आडवाणीने विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीची म्हणजे डिंपल चीमा यांची भूमिका साकारली आहे. सिनेमातील दोघांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक होताना दिसतंय.