लोकप्रिय अमेरिकन गायिका बेबे रेक्सावर एका चाहत्याने भर कॉन्सर्टमध्ये फोन फेकला. फोन लागल्याने बेबे रेक्साला डोळ्याला दुखापत झाली आहे. रविवारी तिच्या कॉन्सर्टमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर बेबे रेक्साने स्वतः फोटो पोस्ट करून तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची दोन्ही मुलं काय काम करतात? माहिती देत म्हणाले, “पार्थेशने दोन वर्षे…”

सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये गर्दीतून रेक्सावर फोन फेकल्याचं दिसतंय. तसेच फोन चेहऱ्यावर लागल्यानंतर ती गुडघ्यांवर बसते आणि वेदनेने विव्हळताना दिसते. नंतर तिला तिथून रुग्णालयात नेण्यात आले.

न्यू जर्सी येथील निकोलस मालवग्ना नावाच्या २७ वर्षीय तरुणाने रविवारी न्यूयॉर्क शहरातील पिअर १७ मध्ये सुरू असलेल्या कॉन्सर्टदरम्यान बेबे रेक्सावर फोन फेकला. यामुळे ती जखमी झाली. या घटनेनंतर निकोलसला अटक करण्यात आली. त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या घटनेनंतर चाहते तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत होते. त्यामुळे बेबे रेक्साने फोटो शेअर करत तिची प्रकृती बरी असल्याची माहिती दिली.

दरम्यान, फोन फेकतानाचा व्हिडीओ पाहून चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. कॉन्सर्टमध्ये चाहत्यांनी असे कृत्य करणे योग्य नसल्याचंही ते म्हणत आहेत.