बॉलिवुडमधील लोकप्रिय गायिका नीति मोहन आणि अभिनेता निहार पांड्या यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नीतिने बुधवारी मुलाला जन्म दिला असून निहारने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.

निहारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नीती सोबत एक रोमॅंटिक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. बाळ आणि आई दोघे ही स्वस्थ असल्याचे त्याने सांगितले आहे. “माझ्या सुंदर पत्नीने मला माझ्या वडिलांनी जे शिकवले ते आमच्या मुलाला शिकवण्याची संधी दिली. ती रोज माझ्या आयुष्यात प्रेम पसरवत आहे. नीती आणि आमचे बाळ निरोगी आहेत. आज या पावसाळी आणि ढगाळ दिवशी आमच्या घरी ‘सन-राइज’ झाला आहे,” असे निहार म्हणाला.

पुढे निहार म्हणाला, “संपूर्ण मोहन व पांड्या कुटुंबीयांकडून देव, डॉक्टर, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सर्व हितचिंतकांची मनापासून आभार आणि प्रेम केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”

आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप

दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नीतिच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली. वेडिंग अॅनिवर्सरीच्या दिवशी नीतिने निहारसोबत एक फोटो शेअर करत गर्भवती असल्याची बातमी दिली. “१ + १ = ३ आई आणि बाबा होणार आहोत. आमच्या दुसर्‍या वेडिंग अॅनिवर्सरीच्या दिवसा पेक्षा दुसरा कोणता दिवस उत्तम असेल”, अशा आशयाचे कॅप्शन हे नीतिने दिले. निहार आणि नीति यांचे १५ फेब्रुवारी २०१९ रोजी लग्न झाले.