ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. समाज माध्यमांवर अनेक कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतला आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने पोस्ट शेअर केली आहे. सुबोध सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याने पोस्टमध्ये लिहले आहे “विक्रम गोखले सर… ज्यांनी ज्यांनी मराठी कलाकृती श्रीमंत केली त्यातले तुम्ही एक महत्त्वाचे शिलेदार आहात. तुमच्या बरोबर अनेक कलाकृतींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अनुमती या चित्रपटासाठी तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटात आणि अभिनयात तुम्ही माझे बाप होतात. तुमच्यावर आणि तुमच्यातील कलेवर नितांत प्रेम करणारा तुमचा चाहता…” अशा शब्दात सुबोधने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“खरंच एका चांगला माणूस आणि महान…”; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनावर अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया

सुबोधने आजवर अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. ‘अनुमती’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या चित्रपटात तो विक्रम गोखले यांच्याबरोबर झळकला होता. सुबोधच्या बरोबरीने मुक्त बर्वे, विजू माने, प्रशांत दामले यांसारख्या कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनयाबरोबरच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave shared post regarding late veteran actor vikram gokhale spg
First published on: 26-11-2022 at 19:45 IST