Sukesh Chandrashekhar Letter to Jacqueline Fernandez : २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आता जॅकलिनला तुरुंगातून पत्र लिहिलं आहे. बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिसला त्याने याआधीही पत्र लिहिलं आहे. आता त्याने नवरात्रीचे नऊ दिवस जॅकलिनसाठी व्रत ठेवणार असल्याचंही म्हटल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे सुकेश चंद्रशेखरने?

“डिअर बेबी, १५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होतं आहे. तुझं सगळं चांगलं व्हावं यासाठी मी नवरात्रीचं व्रत करणार आहे आणि नऊ दिवस उपवासही करणार आहे. आपल्या चारही बाजूला सध्या नकारात्मकता आहे. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी देवी आपल्याला बळ देईल. सत्याचा विजय होईल आणि आपण लवकरच एकमेकांबरोबर असू. मी तुझ्यासाठी वैष्णो देवी आणि महाकालेश्वर मंदिरात एक विशेष पूजाही करणार आहे. आपण एकमेकांसह शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहोत. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपण दाखवून देऊ की ते कसे चुकीचे होते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्यासाठी माझी वाघीण आहेस, माझी शक्ती आहेस.” या आशयाचं पत्र सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला लिहिलं आहे.

हे पण वाचा जॅकलिनने हॉलिवूड अभिनेत्याबरोबर शेअर केला फोटो; प्रसिद्ध गायकाने ठग सुकेशचं नाव घेत लगावला टोला, म्हणाला…

सुकेश चंद्रशेखर या भामट्याला २०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात अटक झाली असून तो सध्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे. सुकेशने आत्तापर्यंत अनेकदा जॅकलिन फर्नांडीसला तुरुंगातून पत्र लिहिलं आहे. आता त्याने या पत्रात म्हटलं आहे की आपल्या विरोधात जे काही खटले आणि गुन्हे आहेत ते सगळे चुकीचे आहेत आणि लवकरच आपण एकत्र असू. जॅकलिन फर्नांडिसने सुकेशबरोबरचं नातं कधीही स्वीकारलेलं नाही. त्या दोघांचे अनेक फोटो मात्र व्हायरल झाले आहेत.

हे पण वाचा- जॅकलिन फर्नांडिसला पाहताच चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी गर्दी! | Jacqueliene Fernandez

जॅकलिनच्या आयुष्यात सुकेश कसा आला?

डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.

जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे. हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसार कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.

यानंतर जॅकलिन आणि शेखर (सुकेश) यांच्यात बोलणं सुरू झालं. त्यानंतर हे बोलणं वाढलं. या बोलण्यातून सुकेशने जॅकलिनला किती थापा मारल्या माहित नाही. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी माझं नातं आहे अशी थाप सुकेशने मारली होती. त्यानंतर मी सन टीव्हीचा मालक आहे असंही त्याने जॅकलिनला सांगितलं होतं. मात्र त्याने या सगळ्या थापा मारल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrashekhar pens letter for jacqueline fernandes says he will fast for her during navratri scj