‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. त्यानंतर आता तिची आणखी एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिनाक्षी राठोड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच मिनाक्षीने इन्स्टाग्रामवर तिचा आणि पती कैलास वाघमारेसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या दोघांनीही नवीन गाडी खरेदी केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत ते दोघेही गाडीच्या आजूबाजूला उभे असल्याचे दिसत आहे.

“हो आम्ही…”, ‘तान्हाजी’ चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता होणार बाबा

या फोटोला मिनाक्षीने फारच हटके कॅप्शन दिले आहे. “दोनाचे ते चार झाले”, असे तिने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. तिने या फोटोला कॅप्शन देतेवेळी गाडी, लहान बाळ, एक जोडपं आणि हार्ट असे चार इमोजीदेखील शेअर केले आहेत. मिनाक्षीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान मिनाक्षीने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. यावेळी तिने तिचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोला कॅप्शन देताना ‘हो! आम्ही गरोदर आहोत’, असे मिनाक्षीने म्हटले आहे. तिच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे. कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मिनाक्षी राठोड ही देवकीच्या भूमिकेत दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta devki minakshi rathod buy new car share photo nrp