अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रिनी सेनदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर रिनीचे लाखो चाहते आहेत. अनेकदा रिनी आई सुष्मितासोबतचे किंवा बहिणीसोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. रिनीने नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या फोटोची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा असून रिनीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील झालाय.
रिनीने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केलाय. यात ती तिची टोन बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय. क्रॉप टॉप आणि शार्टस् परिधान केलेला रिनीचा हा फोटो वर्कआउट नंतरचा असल्याचं लक्षात येतंय. रिनीने मिरर सेल्फी शेअर केलाय. तर या फोटोला रिनीने हटके कॅप्शन देखील दिलंय.”वर्कआउट आणि पिझ्झामध्ये मी अडकले आहे.” असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.
रेनीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर नुकताच रेनीने चारू आसोपाचा एक क्यूट फोटो शेअर केला होता. फोटोत चारू बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत होती. चारू रेनीची मामी आहे. हा फोटो शेअर करत रेनी कॅप्शनमध्ये म्हणाली होती, “ही खूप आनंदाची गोष्ट आहे की मामा आणि मामी लवकरच आई-वडील होणार आहेत. सगळ्यांना सेन आणि अशोका कुटुंबियांकडून शुभेच्छा. अलीशा, आलिया आणि मी मोठ्या बहिणी होणार आहोत. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत.” रिनीच्या या पोस्टवर चारूने देखील कमेंट करत तिचे आभार मानले होते.
दरम्यान सुष्मिता सेनने देखील एक पोस्ट शेअर करत ती लवकरच आत्या होणार असल्याची बातमी दिली होती. बाळाच्या आगमनासाठी ती उत्सुक असल्याचं ती पोस्टमध्ये म्हणाली होती.