अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या शिवाय येत्या काळात तापसी अनेक प्रोजेक्टवर काम करतेय. त्यामुळे तापसीचं वेळापत्रत सध्या चांगलच व्यस्त आहे. मात्र अशात सध्या तापसीच्या आई-वडिलांना एक चिंता खूप सतावतेय. तापसीने लवकर लग्न करावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा आहे. तापसीचं कदाचित लग्नच होणार नाही अशी तिच्या आई-वडिलांना चिंता असल्याचा खुलासा तापसीने केलाय.
तापसी पन्नू तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत येते. तापसी गेल्या अनेक दिवसांपासून डेनमार्कचा बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोईला डेट करतेय. नुकत्याच कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत तापसीने अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. यावेळी ती म्हणाली, ” माझ्या आई-वडिलांना पसंत नाही अशा मुलाशी मी कधीही लग्न करणार आहे. या बाबतीत मी प्रामाणिक आहे. त्यामुळे मी कुणालाही डेट करते तेव्हा लग्नबद्दल विचार करते.”
हे देखील वाचा: “निर्लज्जपणाची हद्द झाली”; वयोवृद्ध गार्डने गाडीचं दार उघडल्याने कियारा आडवाणी ट्रोल
पुढे ती म्हणाली, “जेव्हा मी कुणाला डेट करते तेव्हा डोक्यात एक गोष्ट असते की मी या व्यक्तीशी लग्न करू शकत असने तरच या व्यक्तीवर वेळ आणि एनर्जी खर्च करावी. मला टाइमपास करण्यात अजिबात रस नाही. त्यामुळे जर पुढे जाऊन काही होणार नसेल तर नकोच हा माझा दृष्टीकोन असतो. माझे आई-वडील मला कायम लग्न कर म्हणत असतात. तू कुणाशीही लग्न कर पण बस लग्न कर असं म्हणत असतात. त्यांना भीती वाटते की कदाचित माझं कधीच लग्न होणार नाही. त्यामुळे ते चिंतेत आहेत.” असं म्हणत तापसीने तिच्या लग्नावर भाष्य केलं.
तापसी तेलगू सिनेमा ‘मिशन इम्पॉसिबल’ मध्ये झळकणार असून नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.या सिनेमात तापसीसोबतच ऋषभ शेट्टी आणि सुहास झळकणार आहेत. याशिवाय तापसी लवकरच ‘लूप लपेटा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘दोबारा’ या सिनेमा झळकणार आहे.