एखाद्या कलाकाराकडे पाहून त्याचे आयुष्या किती सोपं असते, तो खूप लोकप्रिय आहे असे म्हणतात. मात्र या पाठी त्याची किती मेहनत असते हे त्यांना दिसत नाही. एकदा कलाकार लोकप्रिय झाला की त्याला ते कायम ठेवण्यासाठी पण संघर्ष करावा लागते, मेहनत घ्यावी लागते. सतत प्रेक्षकांच्या नजरे समोर राहवे लागते. छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माला पण हा संघर्ष करावा लागला होता.

निया ‘जमाई राजा’, ‘काली’, ‘नागिन’ अशा अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत झळकली आहे. तसंच ‘एक हजारो मे मेरी बेहेना है’ मधील तिच्या भूमिकेमुळे तिने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले. तरीही ही मालिका संपल्यानंतर तिच्याकडे नऊ महिने काहीच काम नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. तसंच त्यावेळेस मालिका सोडल्यास आजच्यासारखं  सोशल मीडिया वगैरे पण नव्हते ज्यातून काही पैसे कमवू शकते. निया तिच्या सुरूवातीच्या काळाबद्दल बोलताना सांगितले, “जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आले, तेव्हाा मी एकटीच होते. मी आज जे काही आहे, ते एका हजारों में मेरी बेहना हे  या मालिकेमुळे, या मालिकेने मला घडवले आहे..मात्र ही मालिका संपल्यावर माझ्याकडे जवळ-जवळ एक वर्ष काम नव्हते.”

पुढे निया म्हणाली, “एका हजारों में मेरी बेहना हे  ते जमाई राजा पर्यंत, हे नऊ महीने मी काहीच करत नव्हते. मुंबईत एकटी, नवीन असल्याने माझे फार  काही मित्र नव्हते आणि त्यावेळस आता सारखी उत्पन्नाची इतर साधनही नव्हते. त्यामुळे मी स्वत:वर काम केले;  बेली डान्स शिकायला सुरूवात केली. मला त्या नऊ महिन्यांच्या  आठवणी सुद्धा नको आहेत”. निया तिच्या उत्तम अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकससाठी पण चर्चेत असते. नुकताच नियाचा जमाई राजा 2.0 ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. तसंच तिचे ‘दो घूंट’ हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालता आहे.